मुंबई: ‘आय मी और मैं’ हा आपल्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट असल्याचे अभिनेत्री प्राची देसाईने म्हटले आहे. प्राचीने या चित्रपटात हेअरड्रेसरची भूमिका केली आहे. जॉन अब्राहमचीही यात प्रमुख भूमिका आहे.

मुंबई: ‘आय मी और मैं’ हा आपल्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट असल्याचे अभिनेत्री प्राची देसाईने म्हटले आहे. प्राचीने या चित्रपटात हेअरड्रेसरची भूमिका केली आहे. जॉन अब्राहमचीही यात प्रमुख भूमिका आहे.
आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत प्राचीला आपल्या वयाला साजेशी भूमिका पहिल्यांदाच मिळाली आहे. ती म्हणाली की, मी आतापर्यंत माझ्या वयापेक्षा अधिक वा कमी वयातील व्यक्तींच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र ‘आय, मी और मैं’ मध्ये प्रथमच माझ्या वाट्याला व्यक्तिगत जीवनातील वास्तववादी पात्र आले आहे.
ज्याप्रमाणे ‘रॉक ऑन’ हे माझे बॉलीवूडमधील पहिले पाऊल ठरले; अगदी त्याचप्रमाणे, ‘आय, मी और मैं’ हा माझ्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट ठरला आहे. जॉनबरोबर काम करण्याचा अनुभव अद्भुत असल्याचेही तिने नमूद केले.