अण्णांच्या चित्राला मिळाली वीस हजाराची किंमत

नवी दिल्ली दि.२३ – भारतातील सर्वात मोठा तुरूंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या तिहार तुरूंगातील कैदी चित्रकाराने काढलेल्या समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तैलचित्राची प्रदर्शनात वीस हजार रूपयांना विक्री झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. हे चित्र एका पर्यटकाने विकत घेतल्याचे तुरूंगाधिकार्यां नी सांगितले.

एम लंकेश्वरन हा कैदी खुनाच्या गुन्ह्याबद्दल तिहारमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. गतवर्षी लोकपाल बिल आंदोलनात अण्णा उपोषणाला बसल्यानंतर त्यांना तुरूंगात टाकण्यात आले होते तेव्हा अण्णा तीन दिवस तिहार जेलमध्ये होते. लंकेश्वरन यांनी अण्णांचे चित्र त्याचवेळी रेखाटले. लंकेश्वरन या तुरूंगातील २० प्रशिक्षित चित्रकारांपैकी एक असून त्यांनी आत्तापर्यंत ३० कैद्यांना चित्रकलेचे प्रशिक्षणही दिले आहे. कैद्यांनी काढलेल्या चित्रांची प्रदर्शने दिल्लीतील पंचतारांकित हॉटेल्स तसेच सिटी मॉल्समधून भरविली जातात. त्यातच अण्णांचे हे चित्र विक्रीसाठी ठेवले गेले होते असेही सांगण्यात आले.

Leave a Comment