स्कोडाची २०१३ मध्ये आठ नवी मॉडेल

जगप्रसिद्ध वाहन उद्योग कंपनी स्कोडा ने २०१३ सालात स्कोडा ऑक्टाव्हियासह आठ नवी मॉडेल्स बाजारात आणण्याचे उदिष्ट्य ठेवले आहे. चीनी रस्त्यावर या मॉडेल्सच्या जोरदार चाचण्या घेतल्या जात असल्याची खबर आहे..फेसबुक पेजवरतीही या मॉडेल्ससंबंधाची माहिती जाहीर करण्यात आली आहे.

या माहितीनुसार जिनिव्हा येथे होणार्याआ मोटर शो मध्ये ही मॉडेल्स सादर केली जातील. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व प्रथम स्कोडा ऑक्टाव्हिया काँबी हे मॉडेल सादर होईल. त्यानंतर क्रमाक्रमाने स्कोडा व्हीआरएस, स्कोडा सुपर्ब फेसलिफ्ट, सुपर काँबी फेसलिफट, स्कोडा येती फेसलिफ्ट व शेवटी फाबिया हचबॅक अशी मॉडेल्स बाजारात आणली जातील.