मुन्नीची नवा ट्रेंड

काही दिवसापुर्वी हिट ठरलेल्या ‘दबंग-२’ या सिनेमामुळे पुन्हा एकदा मुन्नी फेमस झाली आहे. त्यामध्ये सादर केलेल्या आयटम नंबरमुळे अभिनेत्री मल्लिका अरोरा-खान ही पुन्हा एकदा हिट ठरली आहे. आयटम सॉंग शिवाय तिच्याकडे आणखीन एक लपलेला गुण पहावयास मिळाला.

त्याचा खुलासा अभिनेत्री मल्लिकाने नुकत्याच एका कार्यक्रमप्रसंगी केला. मुंबईमध्ये किचन संबधित आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमप्रसगी केला. या लॉन्चिंग सेरेमनीवेळी अभिनेत्री मल्लिका खान ही खाण्या-पिण्याची शोकीन असल्याचे तिने स्पष्ट केले. एवडेच नव्हे तर तीला जेवण तयार करण्याची देखील तिला खूप आवड आहे.

तिची असलेल्या या आवडीमुळे ती कुक बुक बनविण्याची प्लानिंग करीत आहे. मल्लिका तिचे कुकिंग टैलेंट पति अरबाज आणि तिचा १० वर्षाचा मुलगा यांच्यासोबत शेयर करीत असते. मल्लिका म्हणाली , ‘मला खाण्यास खूप आवडते. त्यासोबतच स्वयपाक करण्याची आवड आहे. त्याचा मी नेहमीच एंजॉय घेते. कुकिंग मध्ये मला सर्व पदार्थ तयार करता येतात.’

Leave a Comment