‘मुन्नाभाई-३’चे दिग्दर्शन सुभाष कपूरकडे

मुंबई: अभिनेता संजय दत्तच्या ‘मुन्नाभाई सिरीज’मधील ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहे मुन्नाभाई’ या चौकटीबाहेरच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत त्यांना जिंकून घेतले होते.
याच मालिकेतील तिसरा चित्रपट आता येऊ घातला असून ‘फस गये रे ओबामा’फेम दिग्दर्शक सुभाष कपूर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

या वृत्ताला दुजोरा देताना कपूर म्हणाले की, मुन्नाभाई मालिकेतील तिसर्‍या चित्रपटाचे दिग्दर्शन मी करणार आहे. ही संधी मिळाल्यामुळे मी उत्साहित झालो असून दिग्दर्शनासाठी उत्सुक आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ (२००३) आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ (२००६) या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

तिसर्‍या चित्रपटाचे दिग्दर्शन आपल्याकडे खेचण्यात सुभाष कपूर यशस्वी झाले आहेत. कपूर सध्या ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. अर्शद वारसी, बोमन इराणी आणि अमृता राव आदींच्या त्यात प्रमुख भूमिका आहेत.

Leave a Comment