नायकवडी यांना शाही विवाह भोवला; ‘राष्ट्रवादी’तून हकालपट्टी

सांगली: सांगलीचे महापौर इद्रिस नायकवडी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे आदेश मानत नसल्याने त्यांची हकालपट्टी केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे.

याच संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली. पक्षनेत्यांचे निर्देश डावलून नायकवडी यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. राष्ट्रवादीपुरस्कृत विकास महाआघाडीचे नायकवडी हे महापौर आहेत.

नायकवडींनी त्यांच्या मुलाच्या शाही विवाहात मनपा कर्मचार्‍यांना जुंपल्याची धक्कादायक बाब उघड झाली. त्यामुळे राष्ट्रवादीवर चांगलीच टीका झाली होती.

Leave a Comment