मुंबई – मराठी चित्रपट-नाटय सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर यांचे शनिवारी पहाटे ३.२० च्या सुमारास बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते बॉम्ब हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसाच्या विकारावर उपचार घेत होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनाने मोठी हानी झाली आहे अशी प्रतिक्रिया काही मान्यवरांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर यांनी साठ वर्षाच्या अभिनय कारकिर्दीत नाटक, मालिका आणि चित्रपटातून भूमिका केल्या. विजया मेहता, व्ही.शांताराम यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले. असंभव मालिकेत भालेकरांनी साकारलेली सोपान काकांची भूमिका विशेष गाजली. भालेकरांनी पन्नासहून अधिक नाटकात वेगवेगळया भूमिका केल्या.
त्यांच्या फूटपायरीचा सम्राट, चक्र, सारांश या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. भालेकरांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा नाटय दिग्दर्शक हेमंत भालेकर, पाच मुली, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्याच्या निधनाने मोठी हानी झाली आहे अशी प्रतिक्रिया काही मान्यवरांनी व्यक्त केली.