कोणत्याही ठिकाणी आग लागल्याची घटना घडली तर आग विझविण्यासाठी येणार्याब अग्निशमन दलाच्या जवानांना आगीतून माणसे बाहेर काढताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यातील मुख्य समस्या असते ती धुराचे प्रचंड लोट आणि आगीचे थैमान यातून पलिकडचे कांहीच दिसू शकत नाही. त्यामुळे ज्वाळांपलिकडे कुणी अडकले आहे काय याचा शोध प्रत्यक्ष आगीत शिरल्याशिवाय घेणे अशक्य बनते. यावरचा उपाय म्हणून इटालितील संशोधकांनी होलोग्राफिक कॅमेरा तयार केला आहे. जळत्या लपलपत्या ज्वाळातूनही पलिकडचे दृष्य पाहणे यामुळे अग्नीशमन दलाच्या जवानांना शक्य होणार आहे.
आजपर्यंत अशा घटनांत इन्फ्रारेड कॅमेर्यां चा वापर केला जात आहे. मात्र हे कॅमेरेही आगीच्या ज्वाळांपलिकडचे पाहू शकत नाहीत. नव्या कॅमेर्यातमुळे थ्रीडी प्रतिमा दिसू शकणार आहे कारण यात डिजिटल होलोग्राफीचा वापर केला गेला आहे. होलोग्राफी याचा अर्थच कोणत्याही वस्तूची थ्रीडी इमेज. उदाहरण द्यायचे तर क्रेडीट कार्डावर असणारे होलोग्राम.
या तंत्रज्ञानात लेझर बीम दोन भागात विभागला जातो पैकी एक ऑब्जेक्ट किरण असतो तर दुसरा असतो रेफरन्स बीम. नंतर हे दोन्ही किरण पुन्हा एकत्र आणले जातात त्यातून थ्रीडी इमेज तयार होते. हे किरण दाट धूर, आगीच्या ज्वाळांपलिकडे जाऊ शकतात व तेथून पुन्हा परावर्तित होतात तेव्हा पलिकडचे दृष्य पाहता येते असे या संशोधकांचे म्हणणे आहे. यापुढे असे पोर्टेबल कॅमेरे तयार करण्यासाठी हे संशोधक काम करणार असून त्यांचा वापर मोठ मोठ्या इमारती, बोगदे, बेसमेंट येथे करता येणार आहे.