वीनाला करायचा आहे चैलेंजिग रोल

वाढदिवसादिवशी १३७ किसचे रेकार्ड करणा-या पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिकला आगामी काळात ड्रीम रोल करायचा आहे. तिच्याकडे सध्या खूप काम तरी पण तिला येत्या काळात आव्हानात्मक भूमिका करायाच्या आहेत. सध्या ती चैलेजिंग रोलची वाट पाहत आहे.

याबाबत बोलताना अभिनेत्री वीना म्हणाली, ‘ सध्या करीत असलेल्या भूमिकावर मी खुश आहे. मात्र पूर्णपणे संतुष्ट नाही. गेल्या काही दिवसपासून मी केवळ हिंदी सिनेमात काम करते असे नाही तर मी त्याशिवाय कन्नड आणि तेलगू भाषेतील सिनेमात काम करते. सध्या मी राम गोपाल वर्मा च्या ‘जि़दगी ५०-५०’ आणि राजीव रुइयाच्या ‘मुम्बई १२५ कि.मी. ३डी’ या सिनेमत काम करीत आहे. त्याशिवाय माझ्या ग्लैमरस आणि बोल्ड रोलमुळे मला हॉलीवुडच्या ‘दि सिटी दैट नेवर स्लीप्स’ या सिनेमात काम करण्याची साडी मिळाली आहे.’

नुकतीच वीनाच्या वाढदिवसानिम्मित किसिंग स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्यामध्ये तिने ‘दि सिटी दैट नेवर स्लीप्स’ या सिनेमातील यूनिटला सहभागी करून घेतले होते. या स्पर्धेत एक मिनिटात वीनाच्या हाताला कीस करायचे होते. यावेळी १३७ जणांनी वीनाला कीस केले. या स्पर्धेमुळे एक रिकार्ड झाले आहे.

Leave a Comment