मारूतीची ए स्टार आणणार नवा ट्रेन्ड

वाहनांची पूर्वीची आणि अत्याधुनिक मॉडेल्स सारख्याच प्रमाणात विकली जाणार्यार बाजारपेठात भारत आणि चीन प्रमुख बाजारपेठा आहेत. त्यामुळे पूर्वीच्या मॉडेल्सची नवी व्हर्जन सातत्याने येथील बाजारात येत असतात. अल्टो, के १०, ए स्टार, असेंट, वेर्ना, स्पार्क बीट ही त्याची कांही उदाहरणे सांगता येतील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठात मात्र पूर्वीची मॉडेल्स फेज आऊट करण्यात येतात.

भारतात मात्र जुन्या मॉडेल्ससाठीही चांगली मागणी आहे हे लक्षात घेऊन कार उत्पादक अशा वाहनांचे उत्पादन करत असतात. मारूतीच्या ए- स्टारने जगभराच्या बाजारपेठेसाठी हा ट्रेन्ड सेट करण्याचा निर्धार केला असून ही गाडी विविध बाजारपेठांत विविध नांवांनी विक्रीसाठी आणली जाणार आहे. अल्टोच्या पुढचे असलेले हे मॉडेल सुझुकी ए स्टार, अल्टो, सेलेरिओ, निस्सान पिक्सो अशा नावांनी बाजारात येणार आहे असे समजते.

या मॉडेलचेच इको व्हेरिएंट पर्यावरण पूरक म्हणून बाजारात दाखल होत असून ही गाडी लिटरला तब्बल ३३ किमी अॅव्हरेज देईल असा कंपनीचा दावा आहे. हे साध्य करण्यासाठी या गाडीचे वजन २० किलोंनी कमी करण्यात आले आहे व अरोडायनॅमिक डिझाईन त्यासाठी वापरले गेले आहे. ही गाडी ह्युंडाई आय टेन आणि शेव्हरोलेटच्या बीट डिझेल मॉडेलशी टक्कर देईल असे सांगण्यात येत आहे.