गेल्या काही दिवसापासून भारतीय गोलदाजासाठी मदतगार खेळपट्टी तयार करा अशी मागणी कर्णधार धोनीकडून केली जात होती. मात्र त्याला हवी तशी खेळपट्टी इंग्लंड दौ-यावेळी तयार करण्यात न आल्याने या मालिकेत टीम इंडियाला सपाटून मार खावा लागला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी कशी पीच असणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली होती. मात्र टीम इंडियाच्या फिरकी गोलदाजना व फलंजाना मदतगार ठरणा-या टर्नीग ट्रकचे गुपित उघड झाले आहे.
फिरकीला मदतगार खेळपट्टीवर कसोटी सामना तिस-या किंवा चौथ्या दिवशी संपतो. मात्र, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत असे घडले नाही. खेळपट्टीकडून फिरकीपटूंना खूप मदत मिळाली. त्या शिवाय यावर टीम इंडियाच्या फलंदाजांनी मनसोक्त धावासुद्धा काढल्या. सामना पाच दिवस चालला व टीम इंडियाने शानदार विजयसुद्धा मिळवला. खेळपट्टी टीम इंडियाच्या मनासारखी होती आणि विदेश तज्ज्ञांनी यावर टीकासुद्धा केली नाही.
याची माहिती देताना एम. ए. चिदंबरम स्टेडियमचे क्युरेटर के. पार्थसारथी म्हणाले, ठरलेल्या जागी खेळपट्टीवर पाणी मारले गेले आणि उर्वरित जागेला कोरडे ठेवण्यात आले होते. खेळपट्टीच्या दोन्ही दिशांनी बाहेरची बाजू कोरडी ठेवण्यात आली. फिरकीपटूंना येथे चेंडू टाकून टर्न करावा लागतो. येथे खेळपट्टी कोरडी असल्याने फिरकीपटूंना मदत मिळाली. मात्र, पिचच्या स्टंपलाइनवर अर्थात मधल्या भागात पाणी टाकण्यात आले. याला सलेक्टिव्ह वॉटरिंग पद्धत म्हटले जाते. हीच पद्धत आता आगामी काळात पीच तयार करताना अमलात आणण्याचा प्रयत्न असणार आहे.