हॅगेल यांना अमेरिकन मुत्सद्द्यांचा घरचा आहेर

वॉशिंग्टन: अफगाणिस्तानच्या आर्थिक विकासासाठी भारताकडून होणारी आर्थिक मदत महत्वाची आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकेने सैन्य मागे घेतल्यानंतर अफगाणिस्तानसाठी भारत हाच एक महत्वाचा आधार त्यांच्यासाठी असणार आहे असे अमेरिकेने म्हटले आहे.

पाकिस्तानला अफगाणिस्तानातून जो त्रास होत आहे त्याला तेथे भारताकडून केली जाणारी आर्थिक मदत कारणीभूत असल्याचा जावईशोध अमेरिकेतील एक वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी चुक हॅगेल यांनी नुकताच लावला होता. त्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या दुसर्‍या एका वरीष्ठ अधिकार्‍याने भारताच्या भूमिकेचे समर्थन करीत; भारताने अफगाणिस्तानच्या उभारणीसाठी दिलेल्या आर्थिक योगदानाबद्दल कौतुकोद्गार काढले.

अमेरिकेचे दक्षिण आणि मध्य अशिया विभागाचे सहाय्यक मंत्री रॉबर्ट ब्लेक यांनी म्हटले आहे की दक्षिण आशियातील कोणत्याही विषयावरील चर्चा भारतापासूनच सुरू होते. भारताने पहिल्यापासूनंच अफगाणिस्तानला वर आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक योगदान दिले आहे.

Leave a Comment