रशियात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानावर बंदी

मॉस्को दि.२६ – रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी रशियात सार्वजनिक ठिकाणी ध्रुम्रपान करण्याच्या कायद्यावर सही केली असून हा कायदा १ जूनपासून अमलात येईल असे क्रेमलिन तर्फे जाहीर करण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार रशियात धुम्रपान करणार्या त प्रौढ व्यक्तींचे प्रमाण ४० टक्के इतके प्रचंड आहे. यामुळे रशियाचा आरोग्य सेवांसाठीचा खर्च वर्षाला ५० अब्ज डॉलर्सवर गेला आहे. रशियात सिगरेटचे पाकिट एक ते दोन डॉलर्समध्ये मिळते व सिगरेट खरेदी करण्यात रशिया जगात दुसऱ्या स्थानावर आहे. प्रथम क्रमांकावर चीन आहे.

नवीन कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी येईल तसेच रस्त्याकाठच्या छोट्या टपरी टाईप दुकानांतूनही सिगरेट आणि तंबाकूजन्य पदार्थांची विक्री यापुढे करता येणार नाही. या पदार्थांच्या जाहिरातीवरही नियंत्रणे येणार आहेत. यापूर्वी रशियाने अशा रस्त्याकडेच्या टपरी दुकानातून बिअर विक्री करण्यासही बंदी आणली आहे. परिणामी या छोट्या टपरीधारकांना आता पैसे मिळविण्यासाठी अन्य नव्या उद्योगांचा शोध घ्यावा लागणार आहे.

Leave a Comment