ऑस्करवर माझा विश्वास नाही-सनी देऒल

गेल्या काही दिवसापासून राष्ट्रीय पुरस्कार विजेता असलेला सनी देओल सध्या त्याच्या आगामी काळात असलेल्या ‘आई लव न्यू ईयर’ या सिनेमाच्या प्रमोशनच्या कामात व्यस्त आहे. ऑस्करमध्ये सहभागी होण्याची त्याची इच्छा नसून तो भारतीय प्रेक्षकासोबत खुश असल्याचे त्याने सांगितले .

‘आई लव न्यू ईयर’ या सिनेमाचे ट्रेलर रिलीज करण्याच्या कार्यक्रमासाठी अभिनेता सनी देओल याठिकाणी आला होता. यावेळी बोलताना अभिनेता सनी देओल म्हणला, ‘ भारतीयांना ऑस्करला जाण्याची गरज नाही. आम्ही आहे त्या ठिकानी खुश आहोत. आमची लोकसंख्या १३० कोटी इतकी झाली आहे. सध्या प्रत्येकजन ऑस्करच्या पाठीमागे लागला असून माझा मात्र या ऑस्कर पुरस्कारावर विश्वास नाही. मला पहिल्यांदा राष्ट्रीय पुस्कार मिळाला त्यावेळी मला आश्चर्य वाटले होते.

गेल्या ३० वर्षापासून अभिनयमध्ये करियर करीत असलेल्या सनी देओलला काही वर्षापुर्वीच्या ‘घायल’ आणि ‘दामिनी’ या सिनेमासाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. आगमी काळात येत असलेल्या ‘आई लव न्यू ईयर’ हा एक रोमांटिक कॉमेडी सिनेमा आहे. विनय सप्रू और राधिका रॉव याने दिग्दर्शित केलेला ‘आई लव न्यू ईयर’ या सिनेमात सनी देओल अभिनेत्री कंगना राणावत सोबत झळकणार आहे. हा सिनेमा २६ एप्रिल रोजी रिलीज होनार आहे.

Leave a Comment