नोकियाचा स्वस्तात मस्त स्मार्टफोन

नोकियाने अवघ्या १३ पौंड किमतीचा आणि एकदा चार्ज केल्यावर तब्बल ३५ दिवस चालणारा स्मार्टफोन बाजारात आणण्याचा निर्णय जाहीर केला असून हा फोन मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर केला जाणार आहे.

ज्या देशांत वीजेची तीव्र टंचाई आहे अशा देशांच्या बाजारपेठां कंपनीने डोळ्यासमोर ठेवल्या आहेत. हा नवा नोकिया १०५ फोन एकदा चार्ज केल्यानंतर ३५ दिवस पुन्हा चार्ज करावा लागणार नाही तसेच त्यावर सतत साडेबारा तास बोलणेही ग्राहकाला शक्य होणार आहे. बॅकअप फोन म्हणूनही त्याचा वापर करता येणार आहे.

कंपनीच्या फोन रेंजमधील  हा सर्वात स्वस्त फोन असून त्याला रंगीत स्क्रीन, एफएम रेडिओही देण्यात आला आहे. या फोनचे वजन आहे फक्त ७० ग्रॅम. नोकियाचा फोन उत्पादनातील अनुभव, गुणवत्ता आणि जागतिक लोकप्रियता या फोन निर्मितीमागची मुख्य कारणे असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांचे म्हणणे आहे. अल्टीमेट फेस्टीव्ह फोन म्हणून या फोनला ग्राहक मोठ्या संख्येने पसंती देतील अशी कंपनीची अपेक्षा आहे.