रेहमान मलिक म्हणजे एक विदूषकच: तालिबान्यांची टीका

इस्लामाबाद: पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक हे राजकारणी किंवा प्रशासक नसून ते चक्क एक विदूषक आहेत; या शब्दात पाकिस्तान तालिबानने मलिक यांच्यावर टिका केली आहे.

मलिक हे नेहमीच आमच्याशी शांतता बोलणी करण्याचा विषय जिथे जातील तेथे चघळत असतात. मात्र खर्‍या अर्थाने ते शांतता प्रक्रियेला कधी सुरुवात करणार आहेत; हे त्यांचे त्यांना तरी माहिती आहे का, अशी पृच्छा पाकिस्तान तालिबान या संघटनेचे प्रवक्ते एहसानउल्लाह एहसान यांनी केली आहे. एहसान यांनी मलिक यांची तुलना पश्तुनी नकलाकार इस्माईल शाहिद यांच्याशी केली आहे.

सरकारने जर मलिक यांच्याजागी एखाद्या राजकीय मुत्सद्याची नियुक्ती केली, तर शांतता प्रक्रिया अधिक वेगाने पुढे सरकू शकते. असे असताना सरकारला ही प्रक्रिया सुरु करण्याची इच्छा दिसत नाही; याकडे लक्ष वेधत एहसान म्हणाले की, ज्याअर्थी अजूनही मलिक नको त्या पदावर आरुढ आहेत, तोपर्यंत पाकिस्तानातील दहशतवादाला पूर्णविराम मिळणे शक्य नाही.

Leave a Comment