नाट्यपरिषद निवडणुकीचा वाद गृहमंत्र्यांकडे

मुंबई: नाट्यपरिषद निवडणूकप्रकरणी उत्स्फुर्त पॅनलचे मोहन जोशी यांनी आज गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेतली. गृहमंत्र्यांनी निवडणुकीत लक्ष घालावे अशी मागणी जोशी यांनी केली आहे.

नाट्यपरिषदेच्या निवडणुकीत मतपत्रिका गहाळ होण्याच्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी विनय आपटेंनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मोहन जोशींनी घेतलेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

नाट्य परिषदेच्या मुंबई विभागामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतपत्रिका छापल्याचे समोर आले होते. तसेच शंभर टक्के पेक्षा जास्त मतदान झाल्यानंतर एकच गोंधळ झाला. मतपत्रिकांच्या घोळामुळे ही निवडणुकच रद्द करण्यात आली.

त्यानंतर धर्मदाय आयुक्तांनी याप्रकरणात बोगस मतपत्रिका वेगळ्या काढून मतदान घेण्याचे सुचवले. याप्रकरणी सीआयडी चौकशी करण्याची मागणी विनय आपटेंनी केली आहे.

Leave a Comment