गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेचा धमाका

कोलकाता- गुरुवारी हैदराबाद मध्ये झालेले दोन बॉम्बस्फोट हे अफजल गुरू आणि अजमल कसाब या दोघांना देण्यात आलेल्या फाशीवरील प्रतिक्रिया असावी, अशी शक्यता केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कोलकाता येथे बोलताना वर्तवली.

हैदराबाद येथील बॉम्बस्फोटचा तपास एटीएसकडून केला जात असताना केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी असे वक्तव्य केल्याने महत्व प्राप्त झाले. दोन जणांना फाशी दिल्यानंतर काही प्रतिक्रिया येतील अशी शक्यता आम्हाला होती आणि हे बॉम्बस्फोट त्यामुळेच असावेत, असे शिंदे म्हणाले. या घटनेबाबत आम्ही या आधीच संपूर्ण देशात अलर्ट दिला होता, याचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

या स्फोटाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. घटनास्थळी अनेक महत्वाच्या वस्तू सापडल्या असून तपासणीसाठी त्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या आहेत. लवकरच त्याचा अहवाल प्राप्त होईल. त्या आधारे हल्लेखोर पकडण्यास मदत होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिंदे म्हणाले की, मी राज्यसभेत एनसीटीसी स्थापण्याच्या प्रस्तावावार बोललो आहे. एनसीटीसीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अनेक राज्य त्याच्या विरोधात आहोत. मात्र एनसीटीसी स्थापणे आवश्यक आहे.

Leave a Comment