ओबामा प्रशासन समलिंगी विवाहांच्या बाजूने

वॉशिंग्टन – समलैंगिक विवाहावर लावण्यात आलेली बंदी हटवण्यात यावी, अशी विनंती ओबामा प्रशासनाने अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.

सन १९९६ च्या कायद्यानुसार पुरुष आणि महिला यांच्यातील संबंधालाच विवाह म्हटले जात असे.
या पार्श्वभूमीवर अमेरिकी न्यायालयात प्रशासनाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांचे पीठ २७ मार्च रोजी याचिकेवर सुनावणी घेईल. डिफेन्स ऑफ मॅरेज अ‍ॅक्टला (डीओएमए) संपुष्टात आणावे किंवा नाही; यावर यावेळी निर्णय होणार आहे. हा कायदा समलैंगिकांतील विवाहावर प्रतिबंध निर्माण करणारा आहे.

समलैंगिक विवाहाच्या मुद्द़्यावर समर्थन करणारी कागदपत्रे दाखल करणारे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. सन १९९६ च्या कायद्यातील कलम ३ अनुसार घटनेने दिलेल्या समान संरक्षणाच्या हमीचे उल्लंघन असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

Leave a Comment