अमेरिकेत ८.२ टक्के भारतीय दारिद्र्य रेषेखाली

वॉशिंग्टन – अमेरिकेत राहणारे ८.२ टक्के भारतीय नागरिक हे तेथील मानांकनानुसार दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असल्याचा निष्कर्ष एका सामाजिक संस्थेने प्रसिद्ध केला आहे.

जनगणनेतील आकडेवारी पाहिल्यास अमेरिकेत स्थायिक झालेल्या विविध समूहांमध्ये भारतीयांचे दरडोई उत्पन्न हे सर्वसामान्यंच असल्याचे दिसते. सन २००७ ते ११ या कालावधीच्या जनगणना अहवालानुसार ४२.७ दशलक्ष अमेरिकन दारिद्रयरेषेखालील आयुष्य कंठत आहेत. त्यांचा राष्ट्रीय दारिद्रय दर १४.७ टक्के आहे.

यातील समाधानाची बाब एवढीच की अन्य देशांतून अमेरिकेत स्थायिक झालेल्या समूहांपेक्षा येथील भारतीयांमध्ये गरिबीचे प्रमाण कमी आहे.

जपानमधून अमेरिकेत स्थायिक झालेल्यांमधील दारिद्रयाचे प्रमाणही भारतीयांएवढेच आहे. याव्यतिरिक्त आशियातून अमेरिकेत स्थायिक झालेल्या नागरिकांपैकी नऊ देशांतील नागरिकांचा दारिद्रय दर १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. व्हिएतनाममधील १४.७ टक्के आणि कोरियातील १५ टक्के लोक दारिद्रयरेषेखाली आहेत.

फिलिपाइन्समधून अमेरिकेत स्थायिक झालेल्यांमध्ये गरिबीचे प्रमाण सर्वात कमी म्हणजेच ५.८ टक्के आहे.

Leave a Comment