अजगर करतेय बेबीसिटिंग

python
गोष्ट आहे चीनमधली. नोकरीवर जाणार्याा आईवडीलांना घरात लहान मुले असतील तर त्यांचा सांभाळ कोण करणार याची सतत काळजी लागून राहिलेली असते. अशा वेळी आजीआजोबा घरात असतील तर मुलांची काळजी आपोआपच घेतली जाते पण ते नसतील तर बहुतेक पालक अशा वेळी घरात दिवसभराची दाई ठेवण्याचा अथवा मुलांना पाळणाघरात ठेवण्याचा पर्याय स्वीकारतात. चीममधील एका जोडप्याने मात्र एक आगळीच उपाययोजना आपल्या चिमुकल्याचा सांभाळ करण्यासाठी अमलात आणली आहे.

या चीनी पालकांनी त्यांचा मुलगा चान लाऊ सहा वर्षांचा असताना एका अजगराचे अंडे घरात आणून ते उबविले. या अंड्यातून बाहेर आलेल्या अजगराचा त्यांनी सांभाळ केला पण आपल्या छोट्या मुलालाही त्याची चांगलीच सवय लावली. आता चान १३ वर्षांचा आहे आणि सात वर्षांचे हे अजगर तब्बल १५ फूट लांब झाले आहे. मात्र चान त्याला जवळ घेतो, त्याचे पापे घेतो त्याच्याशी खेळतोही.

चानच्या वडिलांच्या मते साप हे नेहमीच सुंदर प्राणी असतात. त्यांनी आणलेल्या बर्मीज अजगराच्या अंड्यातून पिलू बाहेर आले तेव्हा हे अजगर मोठे होताना चानशी अतिशय प्रेमाने वागत असल्याचे त्यांना आढळले. अजगर मुलाला कांहीही इजा करणार नाही याची खात्री पटल्यावर कांही दिवसांनी त्यांनी मुलगा आणि अजगर यांना एकत्र घरात ठेवायला सुरवात केली. आता हे दोघे इतके जिवलग झाले आहेत की त्यांना वेगळे करणे अशक्य आहे. हे अजगर त्याला आजीच्या मायेने सांभाळते असेही चानच्या वडिलांचे म्हणणे आहे. आता बोला !

Leave a Comment