आयर्न लेडीची आयर्न गाडी लिलावात विक्रीला

लंडन दि.२३ – ब्रिटनच्या आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी उत्तर आयर्लंडच्या दौर्याावेळी वापरलेली बॅटल बस लिलावात १७ हजार पौंडांना विकली गेली असल्याचे लिलाव करणारी कंपनी जे.पी. ह्युबर्ट ऑक्शनर यांनी जाहीर केले आहे. ही बस एका गाड्या जमविण्याचा छंद असलेल्या व्यक्तीने खरेदी केली आहे.

या गाडीचे वैशिष्ठ म्हणजे तिचे स्वरूप अजिबात आकर्षक नाही. १९८० साली बनविली गेलेली ही बस २८ टनी असून ती बुलेटप्रूफ आहेच पण रासायनिक, जैविक अथवा अण्विक स्फोटांचाही तिच्यावर परिणाम होत नाही. ब्रिटीशाच्या अमलाखाली असलेल्या आणि हिंसाचाराचा सतत उपद्रव असलेल्या उत्तर आयर्लंडच्या भेटीवर जाताना थॅचर यांच्यासाठी ही बस खास बनविली गेली होती. या बसचे सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन तिचा लिलाव करण्यात आला.

गेल्या २८ वर्षात या बसचे केवळ २८ हजार किलोमीटर रनिंग झाले आहे. थॅचर यांच्यानंतर या बसचा वापर सैनिकांची ने आण करण्यासाठी करण्यात येत होता. आयर्न बस फॉर आयर्न लेडी असे नामकरण करण्यात आलेल्या या बसची क्षमता ३५ प्रवासी बसण्याइतकी आहे.

Leave a Comment