महात्मा फुले यांच्या जीवनावर चित्रपट

मुंबई:समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रपटाचे काम लवकरच सुरू होणार आहे. राज्य शासनाने त्यासाठी अनुदान मंजूर केले असून डॉ. जब्बार पटेल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. पटेल यांनी यापूर्वी दिग्दिर्शित केलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट यशस्वी ठरला आहे.

बालगंधर्व रंगमंदिरात नुकताच महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित आसूड या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच संस्थापक अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी महात्मा फुलेंवर आधारित चित्रपटाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

Leave a Comment