हिलरी भाषणासाठी आकारणार २ लाख डॉलर्स

वॉशिग्टन दि.२२- अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव पदावरून नुकत्याच पायउतार झालेल्या हिलरी क्लिंटन यांनी स्पिकींग सर्कीटमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून या अंतर्गत त्या जी भाषणे देतील, त्या प्रत्येक भाषणासाठी हिलरींना २ लाख डॉलर्स दिले जाणार आहेत असे समजते. हिलरी परराष्ट्र सचिव म्हणून काम करत होत्या तेव्हा त्यांचा पगार होता १ लाख ८६ हजार डॉलर्स.

हिलरी न्यूयॉर्कच्या हॅरी वॉकर संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून काम करणार असून त्या या संस्थेच्या हायेस्ट पेड पब्लीक फिगर बनल्या आहेत. हिलरी यांचे पती व अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनीही या संस्थेचे प्रतिनिधित्व केले असून त्यांना प्रत्येक भाषणासाठी १ लाख ८९ हजार डॉलर्स दिले जात होते. बिल यांनी गेल्या ११ वर्षात या संस्थेसाठी ४७१ पेड स्पीच दिली आहेत.

या संस्थेतर्फे चित्रपट अभिनेता आणि गव्हर्नर अरनॉल्ड श्वायगेअर, अल गोर, डीक चेनी आणि सारा पालिन यानीही प्रतिनिधित्व केले आहे.

Leave a Comment