तिरूपती आता तुमच्या मनगटी घड्याळावर

balaji

तिरूपती बालाजी हे भारतातील श्रीमंत देवस्थानात गणना होणारे क्षेत्र. करोडो भाविक वेंकटेशाच्या दर्शनासाठी येथे येत असतात. ज्यांना वेंकटेश सतत आपल्यासोबत असावा असे वाटते अशा भाविकांसाठी स्वीस कंपनीने लिमिटेड एडिशन घड्याळ बाजारात आणले आहे. किमत आहे फक्त २७ लाख रूपये.

या घड्याळात सोन्यात कोरलेली आणि हिरे, माणके, पाचू जडविलेली बालाजीची प्रतिमा असून या घड्याळांची विक्री जगभर करण्यात येणार आहे. अशी फक्त ३३३ घड्याळेच तयार करण्यात आली आहेत. तिरूपती ट्रस्ट या उपक्रमात सहभागी झालेला नाही मात्र या घडयाळांच्या विक्रीतून मिळणार्यार रकमेतील कांही भाग ट्रस्टच्या चॅरिटी हॉस्पिटलसाठी वापरला जाणार आहे.

याविषयी बोलताना तिरूपती बालाजी ट्रस्ट चे प्रमुख सी.व्ही. सुब्रह्मण्यम म्हणाले की आम्हाला वेंकटेशाचे फोटा विकण्याची परवानगी नाही. ट्रस्ट ची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटी रूपयांची आहे. आम्ही फोटो विकत नसलो तरी ते उपलब्ध असतात. भाविक विकत घेतात, नेटवर टाकतात, उत्पादक त्याचा जाहिरातीतही वापर करतात मात्र त्यावर आमचे नियंत्रण नाही. फोटोचा गैरवापर होत असेल तरच आम्ही कारवाई करू शकतो. आता स्वीस कंपनी घड्याळे काढते आहे मात्र त्यांच्याशी आम्ही कोणताही करार केलेला नाही.

Leave a Comment