फिल्म निर्माता राम गोपाल वर्माने आगामी काळात येत असलेल्या त्याच्या ‘दि अटैक्स ऑफ २६/११’ या सिनेमाचे निमंत्रण देऊन करण जौहरकडे दोस्तीचा हात पुढे केला आहे. करणसाठी त्याने एक विशेष शो आयोजित केला आहे.

फिल्म निर्माता राम गोपाल वर्माने आगामी काळात येत असलेल्या त्याच्या ‘दि अटैक्स ऑफ २६/११’ या सिनेमाचे निमंत्रण देऊन करण जौहरकडे दोस्तीचा हात पुढे केला आहे. करणसाठी त्याने एक विशेष शो आयोजित केला आहे.
दिग्दर्शक करण जौहर बॉलीवूडमधील प्रमुख सिनेनिमार्ता आहे. त्याशिवाय तो रामगोपालचा चांगला मित्र देखील आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यातील संबध बिघडले होते. काही दिवसापासून दोघेही ट्विटरवर बॊलत होते. त्यानंतर वर्माने ट्विटरवरूनच त्याला सिनेमाचे निमंत्रण दिले होते.
कित्येक वर्षापासून रामू आणि करण एकमेकांच्या सिनेनिर्मितीच्या शैलीवर टिप्पणी करत आहेत. याबाबात बोलतना वर्मा म्हणाला की, माझा आणि करणचा तसा गंभीर वाद नाही. आमच्यामधे कोणतीच समस्या नाही. आमच्यातील वाद मिडीयाने वाढविला.
‘दि अटैक्स ऑफ २६/११’ या सिनेमात अभिनेता नाना पाटेकर आणि संजीव जयस्वाल यांची प्रमुख भूमिका आहे. हा सिनेमा एक मार्चला रिलीज होणार आहे.