रणबीर – दीपिकाची ‘जवानी दीवानी’

गेल्या काही दिवसापासून अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणची ‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमाचा हॉट टॉपिक सध्या चर्चेचा विषय झाला आहे. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांची फ्लॉप झालेली प्रेम कहानी आता पुन्हा एकदा नवीन वळण घेत आहे. याचे संपूर्ण श्रेय दिग्दर्शक अयान मुखर्जीला जाते. ‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमात रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण मोठे रोमँटिक कपल म्हणून झळकणार आहे.

फक्त सिनेमातच नव्हे तर शूटिंगच्या सेटवर दोघांची केमिस्ट्री खूपच जुळली. सेटवर रणबीर दीपिकाशी खूपच जवळीक साधत होता. यावेळी दोघेपण एकत्र वेळ घालविताना दिसले. एवढेच नव्हे तर ते एकत्रित हसताना सुद्धा दिसत होते. त्यामुळे पुन्हा या प्रेम कहानी मध्ये नवी ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. येत्या ३१ मे रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

हा सिनेमा इंटरेस्टिंग लव स्टोरीवर आधारित आहे. नुकतेच या सिनेमाचे दोन पोस्टर रिलीज झाले आहेत. दोघेपण सोबत मजा करताना दिसत आहेत. रणबीर आणि दीपिका काही वर्षापूर्वी एकमेकांसोबत डेटिंग करताना दिसत होते.

मात्र रणबीर कपूरची आई नीतू कपूरला दीपिका आणि रणबीरची जोडी पसंत पडली नव्हती. त्यामुळे दोघाचे ब्रेक-अप झाले होते.

Leave a Comment