
मुंबई: देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी बँकिंग आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम करून देशाची गुंतवणूक आणि विकास वाढवावा; असे आवाहन केंद्रीय वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनी केले आहे.

मुंबई: देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी बँकिंग आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम करून देशाची गुंतवणूक आणि विकास वाढवावा; असे आवाहन केंद्रीय वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनी केले आहे.
इंडियन एक्सप्रेस समूहातील ‘द फायनान्शियल एक्सप्रेस’च्या ‘एफ ई बेस्ट बँक पुरस्कार‘ सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी भारतीय वित्तीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या बँकांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. हॉटेल ट्रायडण्टमध्ये झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, एक्सप्रेस समूहाचे मुख्य संपादक शेखर गुप्ता आणि बँकिंग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शर्मा म्हणाले की; भारताने आपल्या आर्थिक ताकदीवर लक्ष देऊन बचतीचा दर वाढवून गुंतवणुकीवर भर दिला पाहिजे त्याचबरोबर उद्योग आणि बँकिंग क्षेत्रांनी गुंतवणूक आणि विकास साधताना भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. जागतिक आणि स्थानिक पातळीवर २०१२ हे वर्ष खूप आव्हानांचे गेले.
यावेळी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की; राज्याच्या बहुतांश भागातील दुष्काळी परिस्थिती हे राज्यासमोरचे एक आव्हान आहे. जनावरांना वाचविणे आणि टंचाईग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यासाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकार तसेच जपान, ब्रिटन यांच्या सहकार्यामुळे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक तसेच दिल्ली -मुंबई, पुणे- बंगलोर या औद्योगिक क्षेत्राचाही विकास लवकरच होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.