मुंबई: मुंबई महापालिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा धारेवर धरले आहे. कर्मचाऱ्यांसाठी कर्नाटकातून साबण खरेदी करण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर मनसेने टीका केली आहे.

मुंबई: मुंबई महापालिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा धारेवर धरले आहे. कर्मचाऱ्यांसाठी कर्नाटकातून साबण खरेदी करण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर मनसेने टीका केली आहे.
सीमाभागात मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या कर्नाटकातून साबण खरेदी करून महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने आपले ‘मराठी प्रेम; किती बेगडी आहे; हे दाखवून दिल्याची टीका मनसेने केली.
महापालिकेच्या वतीने दरवर्षी घनकचरा व्यवस्थापन, मल नि:सारण विभागातील कर्मचार्यांना साबणाचा पुरवठा केला जातो. यावर्षी हे साबण पुरविण्याचे काम कर्नाटक सोप्स आणि डिटर्जण्ट या कंपनीला देण्यात आले. हे कंत्राट २ कोटी ३ लाख रुपयांचे आहे. या निर्णयावर मनसेने टीका केली आहे.
मात्र या कंपनीने सर्वात कमी किंमतीची निविदा दाखल केल्याने नियमानुसार या कंपनीला हे काम देण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला.