नवी दिल्ली: जनता महागाईने होरपळलेली असतानाच आता साखर नियंत्रणमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे साखर कारखानदारांकडून साखरेच्या किंमतीत अवाजवी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी दिल्ली: जनता महागाईने होरपळलेली असतानाच आता साखर नियंत्रणमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे साखर कारखानदारांकडून साखरेच्या किंमतीत अवाजवी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
साखर नियंत्रणमुक्त करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरण विषयक मंत्रीसमितीसमोर साखर नियंत्रणमुक्त करण्याबाबत ६ प्रस्ताव आले आहेत. साखर नियंत्रणमुक्त झाल्यास तिचे दर वाढून सकाळचा पहिला चहा कडू होण्याची वेळ सामान्य माणसांवर येणार आहे.
साखरेच्या दरवाढीचा फटका केवळ सामान्य माणसांनाच बसेल असे नाही; तर सरकारवर अनुदानाचा बोजाही वाढणार आहे. साखर नियंत्रणमुक्त झाल्याने कारखान्यांकडून सरकार नियंत्रित दरात होणारी ‘लेव्ही’ साखरेची खरेदी थांबून सरकारलाही सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी खुल्या बाजारातून साखर विकत घ्यावी लागणार आहे.
त्यामुळे सरकारवर ५ हजार ६७६ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. हा भर हलका करण्यासाठी साखरेच्या एक्साईज करात १५० रुपये प्रती क्विंटल वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. तो अमलात आल्यास त्याचा बोजाही अतिरिक्त दरवाढीच्या रूपाने ग्राहकांवर पडणार आहे.