गांधीजींच्या पत्राचे मोल ९६ लाख रुपये

लंडन: भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक महनीय व्यक्ती आणि जगाला शांततेचा संदेश देणार्‍या महात्मा गांधी यांनी लिहिलेल्या एका पत्राचा तब्बल ९६ लाख रुपयांत लिलाव झाला.

ब्रिटनमधील श्रॉम्पशायर शहरात या पत्राचा लिलाव झाला. गांधीजींनी हे पत्र भारताच्या तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिवांना लिहिले होते. त्यात त्यांनी स्वत:च्या सुटकेची विनंती केली होती. एखाद्या भारतीय नेत्याने लिहिलेल्या एखाद्या पत्राला मिळालेली ही सर्वात मोठी बोली आहे.

एका भारतीयाकडे हे पत्र होते. मलॉक्स या लिलावकर्त्या कंपनीनेच मागील वर्षी महात्मा गांधींचा चष्मा आणि त्यांच्या काही धार्मिक पुस्तकांचा लिलाव केला होता.

Leave a Comment