कुंभमेळा चेंगराचेंगरी प्रकरणाची होणार चौकशी

लखनऊ: अलाहाबाद रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. सरकारने याप्रकरणाच्या चौकशीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ओंकारेश्वर भट्ट यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती केली आहे. तसेच दोन महिन्यांत या प्रकरणाचा अहवाल देण्याचा आदेश या समितीला देण्यात आला आहे.

लाखो भाविकांनी मौनी अमावस्येनिमित्त कुंभमेळ्यात गंगास्नान करण्यासाठी अलाहाबाद येथे गर्दी केली होती. तेथून परतणार्या भाविकांची रेल्वे स्थानकावर गर्दी उसळल्यानंतर अलाहाबाद रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 36 भाविकांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेच्या देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विरोधी पक्षांनी याप्रकरणी सरकारला धारेवर धरले होते.

Leave a Comment