फाशी टाळण्यासाठी वीरप्पनचे साथीदार सर्वोच्च न्यायालयात

बेळगाव: कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याच्या चार साथीदारांनी आपल्या फाशीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बुधवारी या चौघांचा दया अर्ज फेटाळला आहे.

वीरप्पनचा थोरला भाऊ गणप्रकाश, त्याचे साथीदार सायमन, मीसेकर मदाईआ आणि बिलवंद्रन यांनी आपल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. या चौघांना सर्वोच्च न्यायालयाने सन २००४ मध्ये २२ पोलीस आणि वन रक्षकांच्या हत्येबद्दल फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे चौघे कर्नाटकातील पालार वनक्षेत्रात भूसुरुंग पेरल्या प्रकरणी दोषी आहेत.

Leave a Comment