हेलिकॉप्टर घोटाळा: कागदपत्रे देण्यास इटलीचा नकार

नवी दिल्ली- ऑगस्टा वेस्टलॅंड कंपनीला देण्यात आलेल्या १२ हेलिकॉप्टरच्या ३ हजार ६०० करोड रुपयांच्या व्यवहारात दलाली देण्याच्या प्रकरणाबाबत इटलीच्या न्यायालयात दाखल खटल्याशी संबण्धित कागदपत्रे भारताला देण्यास इटालियन न्यायालयाने नकार दिला.

एकीकडे केंद्रीय अन्वेषण विभाग आणि संरक्षण विभागाचे उच्च्स्तरीय पथक हेलिकॉप्टर घोटाळ्याच्या तपासाला वेग देण्याच्या दृष्टीने इटलीला भेट देण्यची तयार करीत असताना इटालियन न्यायालयाच्या या पवित्र्याने भारताला धक्क बसला आहे.

सीबीआयचे उपमहानिरिक्षक दर्जाचे एक अधिकारी, एक विधी अधिकारी आणि संरक्षण विभागाचे संयुक्त सचिव ए. के. बल यांचा इटलीला जाणार्‍या पथकात समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. इटली सरकारच्या वकिलांकडून आपण हेलिकॉप्टर घोटाळ्याची सविस्तर माहिती घेऊ; असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.