
नवी दिल्ली: सत्तेच्या खुर्चीत बसलेले लोक आडमुठे असतात. आपलेच म्हणणे खरे करण्याचा त्यांचा अट्टाहास असतो; अशा शब्दात टीकास्त्र सोडून नियंत्रक आणि महालेखा परिक्षक विनोद राय यांनी सत्ताधार्यांना पुन्हा डिवचले आहे.
नवी दिल्ली: सत्तेच्या खुर्चीत बसलेले लोक आडमुठे असतात. आपलेच म्हणणे खरे करण्याचा त्यांचा अट्टाहास असतो; अशा शब्दात टीकास्त्र सोडून नियंत्रक आणि महालेखा परिक्षक विनोद राय यांनी सत्ताधार्यांना पुन्हा डिवचले आहे.
बहुसंख्य सर्वसामान्य नागरिकांचा सत्ताधार्यांच्या आडमुठेपणाला विरोध असतो; मात्र ते शांत असतात. त्यामुळे आपल्याला जनतेचे समर्थन असल्याचे सत्ताधार्यांना वाटते; अशी टीका राय यांनी केली.
अनेक घोटाळ्यांना उघड करण्याबरोबरच आपल्या वक्तव्यांनी राय यांनी अनेकदा सत्ताधार्यांचा रोष ओढवून घेतला आहे.
त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे त्यांना स्वत:लाच राजकीय महत्वाकांक्षा असल्याची टीका अनेकदा करण्यात आली. स्वत: राय यांनी मात्र याबाबत कधीही वक्तव्य केले नव्हते. शनिवारी मात्र ‘मी राजकारणात येणार की नाही; हे येणारा काळच ठरवेल;’ असे सूचक विधान त्यांनी केले. राय या वर्षी शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत.
अमेरिकेत कॅगच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेत विनोद राय यांनी; सध्याच्या काळात भारतीय लोकशाही प्रगल्भ होत आहे. विशेषत: शहरी मध्यमवर्ग आपल्या हक्कांबाबत जागरूक होत आहे. अशावेळी कॅगने आपले अहवाल केवळ संसदेला सादर करण्याऐवजी त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे; असे प्रतिपादन केले. सरकारने केवळ काही भांडवलदारांना फायदेशीर धोरण निश्चित करण्याऐवजी एकूण उद्योग क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने धोरण आखले पाहिजे; अशी टिपण्णीही त्यांनी केली होती.