वॉशिंग्टन – पृथ्वीपासून फक्त २६ हजार प्रकाशवर्षे दूर असलेले आणि आकाशगंगेत अगदी अलीकडेच तयार झालेले एक नवेच कृष्णाविवर (ब्लॅक होल) अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासाच्या संशोधकांना आढळून आले आहे. हे कृष्णविवर फक्त एक हजार वर्षांचे आहे.

‘चंद्रा एक्स रे ’ या नासाच्या महाकाय दुर्बिणीतून हे कृष्णविवर शोधण्यात आले असून सुपरनोव्हाच्या स्फोटानंतर उरलेल्या अवशेषांमधून हे कृष्णविवर सापडल्याचे नासाचे म्हणणे आहे.
न्यूट्रॉन तार्याची अखेर होत असताना सुपरनोव्हा तयार होत असतात. सुपरनोव्हाचा जन्म होताना बाह्यकवच बाहेर फेकले जाते आणि केंद्रकाच्या रूपाने पल्सार शेवटी राहतो. या अवशेषाचे नामकरण ‘डब्ल्यू 49 बी’ असे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आकाशगंगेत प्रथमच ’डब्ल्यू ४९ बी’ सारखे अवशेष आढळून आले आहेत.
मात्र सुपरनोव्हाच्या अवशेषांमध्ये कृष्णविवर सापडल्याने आश्चर्यचकीत झाल्याची प्रतिक्रिया मेसॅच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या लॉरा लोपेझ यांनी दिली आहे. अशाप्रकारे अवकाशात होणारे स्फोट सर्वसाधारणतः प्रमाणबद्ध रीतीने होतात. याविषयीची सविस्तर माहिती अॅस्ट्रोफिजिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.
सुपरनोव्हाच्या स्फोटानंतर सर्व दिशांना समप्रमाणात सौरवायू फेकले जातात. विषुववृत्तीय प्रदेशांतून सौरवायू मोठ्या प्रमाणावर फेकले जातात. डब्ल्यू ४९ बीच्या स्फोटानंतर ध्रुवीय प्रदेशांत अवशेष फेकले गेले. अवशेषांवर क्ष किरणे टाकल्यानंतर ते चमकतात