प्रेयसीची हत्या: ‘ब्लेड रनर’ जेरबंद

जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचा धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याला पोलिसांनी अटक केली आहे. व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशीच आपल्या प्रेयसीची त्याच्याच राहत्या घरी हत्या केल्याप्रकरणी पोलीस त्याची चौकशी करत आहेत. ऑक्सरने आपल्या प्रेयसीला चोर समजून गोळी मारली अशी माहिती समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकन वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी ऑस्करला अटक करण्यात आली. गोळी प्रेयसीच्या डोक्यात आणि खांद्यात घुसल्याने तिचा मृत्यू झाला.

ब्लेड रनर म्हणून ऑस्कर प्रिस्टोरियसने आपली कारकीर्द गाजवली आहे. कृत्रिम पायांनी धावणार्‍या या अ‍ॅथलिटने पॅरालिम्पिक गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तर गेल्या वर्षी टाईम मॅगझीनने १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीतही ऑस्करचा समावेश केला होता.

व्हॅलेंटाईन सरप्राईज देण्याच्या नादात पिस्टोरिअसच्या मैत्रिणीला आपला जीव गमवावा लागल्याचा दावा स्थानिक वृत्तपत्रांनी केला आहे. व्हॅलेंटाईन सरप्राईज देण्याच्या प्रयत्नात असलेल्या मैत्रिणीला चोर समजून ऑस्करने त्याच्या घरातच गोळ्या घातल्या. यामध्ये तिच्या डोक्याला आणि हाताला छेदून गेलेल्या गोळीने तिचा जीव घेतला. ऑस्कर पिस्टोरिअसने हा खून जाणूनबुजून नाही तर अजाणतेपणी केला आहे; असा दावा स्थानिक माध्यमांनी केला आहे. पोलिसांना ऑस्करच्या घरातच त्याच्या मैत्रिणीचा मृतदेह मिळाला आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

जेमतेम पंचविशीचा ऑस्कर ‘ब्लेडरनर’ या नावाने ओळखला जातो. पाय नसलेला जगातला सर्वांत वेगवान मनुष्य असेही त्याला म्हटले जाते, कारण कार्बन फायबरपासून तयार केलेले कृत्रिम पाय लावून तो धावत असतो.

Leave a Comment