दलित कार्यकर्त्यावर विषप्रयोग केल्याचा टोपेंवर आरोप

औरंगाबाद: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी जालना जिल्ह्यातील खरपुडी गावाचे दलित कार्यकर्ते विलास निकाळजे यांना चहातून विषप्रयोग करून त्यांचा खून केल्याचा आरोप निकाळजे यांच्या कुटुंबियांनी केला. मात्र निकाळजे यांचा मृत्यू होऊन महिना उलटला तरी पोलिसांनी या प्रकरणी प्राथमिक चौकशीही केलेली नाही. टोपे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.

खरपुडी गावातील गायरान जमिनीच्या वादावर चर्चा करण्यासाठी टोपे यांनी विलास यांना जालना येथील आपल्या घरी बोलाविले आणि चहातून विष देऊन त्यांचा खून केला; अशी लेखी तक्रार विलास यांच्या पत्नी जयश्री आणि आई कलाबाई यांनी केली आहे. टोपे पिता पुत्रांकडून आपल्या जीवाला धोका असल्याच्या तक्रारी विलास यांनी देखील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जालना तालुका पोलीस ठाण्यात केल्या होत्या.

Leave a Comment