कुस्तीला वगळण्याबाबत फेरविचार व्हावा: भारताची मागणी

नवी दिल्ली: ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतून कुस्तीला वगळण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा; अशी मागणी भारतीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आंतराराष्ट्रीय ऑलिंपिक समितीला करण्यात येणार आहे. कुस्तीला ऑलिंपिकमधून वळण्याच्या निर्णयाचा विपरीत परिणाम मल्लांच्या मनोबलावर होण्याची भीती मंत्रालयाने व्यक्त केली.

समितीच्या कार्यकारिणीची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये समाविष्ट २५ खेळांच्या यादीत कुस्तीचा समावेश करण्यात आला नाही. जगभरातील कुस्ती संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. या निर्णयावर समितीच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळणे आवश्यक आहे.

भारत कुस्तीप्रेमी देशांना कुस्तीचा ऑलिंपिकमध्ये समावेश करण्याबाबत आपली बाजू मांडेल आणि सन २०२० मध्ये रशियात होण्याऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीचा समावेश करून घेण्यात यशस्वी ठरे; असा विश्वास मंत्रालयाने व्यक्त केला. ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष जॅक रोगे यांनीदेखील ओलिंपिक २०२० मध्ये कुस्तीचे स्थान अबाधित ठेवण्यासाठी काय उपाय करता येतील याबाबत कुस्ती संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

Leave a Comment