उत्तरप्रदेश विधिमंडळात राडा

लखनौ: राज्याची कायदा सुव्यवस्था राखण्यात अखिलेश सरकारला अपयश आल्याच्या कारणावरून बहुजन समाज पक्षाच्या आमदारांनी उत्तर प्रदेशच्या विधिमंडळात अक्षरश: थैमान घातले. राज्यपालांच्या दिशेने कागदी बोळे फेकण्यापर्यंत या आमदारांनी मजल गाठली.

राज्यात कायदा सुव्यवस्था नावालाही शिल्लक नाही. अलाहाबाद येथे कुंभ मेळ्यादरम्यान रेल्वे स्थानकावर झालेली चेंगरा चेंगरी आणि ३० जणांचे मृत्यू सरकार परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरल्यामुळेच झाल्याचा आरोप करीत बसप आमदारांनी सभागृह डोक्यावर घेतले. सरकार विरोधी घोषणा देत अनेक आमदार बाकांवर उभे राहिले. काहींच्या हातात निषेधाचे फलकही होते.
हा गदारोळ सुरू असताना मुख्यमंत्री अखिलेश यादव सभागृहात उपस्थित होते.

उत्तरप्रदेशचे राज्यपाल बी. एल. जोशी सभागृहाला संबोधित करण्यासाठी उभे राहिले तरीही हा गदारोळ सुरूच राहिला. काही आमदारांनी त्यांच्या दिशेने कागदाचे बोळे फेकले. अखेर सुरक्षा रक्षकांनी रज्यपलण्भोवतॆ कडे करून त्यांना सभागृहाबाहेर नेले.