स्वामी नित्यानंद यांना महामंडालेश्वरची उपाधी

नवी दिल्ली – सेक्स स्कँडल आरोपात तुरुंगाची वारी केलेल्या स्वामी नित्यानंद यांना, अलाहाबाद कुंभमेळ्यात महामंडालेश्वरपद बहाल करण्यात आले आहे. हा कार्यक्रम अतिशय गोपनीय पद्धतीन करण्यात आला. महामंडालेश्वर उपाधी मिळाल्याने आता १५ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर स्वामी नित्यानंद, शाही रथावर स्वार होऊन शाही स्नान करणार आहेत. मात्र, याबाबत दुसर्‍या आखाड्याच्या साधू संतांनी आक्षेप घेतला आहे.

मंगळवारी संध्याकाळी महानिर्वाणी आखाड्यात गुपचूप झालेल्या समारंभात स्वामी शुकदेवानंद यांनी नित्यानंद यांचा पट्टाभिषेक केला आणि महामंडलेश्वरची पदवी दिली. खरं तर या पट्टाभिषेक सोहळ्याला दुसर्‍या आखाड्यांच्या संत-महंतांना बोलावले जाते. पण या समारंभात फक्त नित्यानंद यांच्या मर्जीतल्याच लोकांना बोलावले गेले. याआधी मुंबईतील गाजलेली राधे मा हिला देखिल महामंडलेश्वर पदवी देण्यात आली होती. पण अनेक आखाड्यांनी विरोध केल्याने ही पदवी रद्द करण्यात आली होती.
सन २०१० मध्ये सेक्स स्कँडल प्रकरणात अडकलेला वादग्रस्त स्वामी नित्यानंद याला गुपचुप महानिर्वाणी अखाड्याचा महामंडलेश्वर नियुक्त करण्यात आले आहे. महानिर्वाणी अखाड्याच्या या निर्णयामुळे अन्य आखाड्याच्या अधिकार्‍यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार मौनी अमावस्येच्या शाही स्नानाच्या वेळी नित्यानंद याला महामंडलेश्वर म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र इतर आखाड्यांच्या महामंडलेश्वरांशी चर्चा केल्याशिवाय घेण्यात आलेला हा निर्णय कुंभमेळ्याच्या परंपरेला साजेसा नाही. वसंत पंचमीच्या दिवशी शाही स्नाना करता स्वामी नित्यानंद देखिल रथावर स्वार अन्य साधूंसोबत अंघोळीसाठी पोहोचला.

जी व्यक्ती कमीत कमी १० वर्षांपासून संन्यासी जीवन व्यतीत करत असेल, जी व्यक्ती कुटुंबाशी जोडलेली नसेल आणि धर्मशास्त्राची जाणकार असेल अशीच व्यक्ती आखाड्याची महामंडेश्वर बनण्याचा अधिकारी आहे, असे अन्य साधूंनी सांगितले. या नियमानुसार राधे मां ला महामंडलेश्वर जाहीर करणे चुकीचे आहे, असाही आवाज साधूंनी उठवला होता. अखेर राधे मां चे हे पद तिच्याकडून काढून घेण्यात आले.