वगळल्याने सुरेश रैना झाला नाराज

गेल्या काही दिवसापासून स्थानिक क्रिकेट स्पर्धेत व इराणी करंडकातही मोठी खेळी करणारा भारताचा भरवशाचा फलंदाज सुरेश रैनाला आगामी काळात होणा-या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटींमध्ये टीम इंडियात स्थान देण्यात आले नाही. या सर्व प्रकारामुळे रैना निवड समितीवर कमालीचा नाराज झाला आहे.

टीम इंडियाच्या कसोटी संघातून गेल्या सप्टेंबर महिन्यापासून सातत्याने त्याला डावलण्यात येत असल्याने सुरेश रैनाने ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे. रैना ट्विटरवर म्हणाला, ‘ ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटींसाठी माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. डावलण्या मागील नेमके कारण समजलेच नाही. गेल्या काही दिवसापासून माझ्याकडून धावा होता आहेत. तर मग माझे चुकले कुठे, असा सवाल त्याने उपस्थित केला आहे.’

कसोटी संघात निवड न झाल्यामुळे वेदना तर होताहेत. पण म्हणून काय मला आगामी काळात डगमगून जमणार नाही. यापुढेही देशासाठी चांगली कामगिरी करण्यासाठी अजून कसून मेहनत करणार असल्याचे रैनाने स्पष्ट केले.

Leave a Comment