भज्जीच्या पुनरागमनामुळे गांगुली झाला खुश

आगामी काळातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवड समितीने हरभजन सिंगची संघात निवड केल्यामुळे टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली खुश झाला आहे. हरभजनच्या पुनरागमनामुळे आगामी मालिकेत टीम इंडियाचे पारडे जड झाले असल्याचे मत गांगुलीने व्यक्त केले आहे.

टीम इंडियासाठी यापूर्वी हरभजनने प्रभावी कामगिरी करून कित्येक सामन्यात एकहाती विजय मिळून दिला आहे. विशेषता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांतील आतापर्यतची त्याची कामगिरी प्रभावी ठरली आहे. त्यामुळे टीम इंडियात हरभजनची निवदिला महत्व प्राप्त झाले आहे.

याबाबत बोलताना गांगुली म्हणाला, ‘ त्याच्या समावेशाबाबत मी नेहमीच आशावादी असतो. त्यामुळे हरभजनला संघात घेण्याचा निवड समितीचा निर्णय महत्वाचा आहे. अंतिम अकरा जणांच्या चमूत त्याला खेळविण्याचा निर्णय कर्णधार धोनीच्या हातामध्ये आहे. जेव्हा एखादा खेळाडू वाईट कामगिरी करतो तर साहजिकच त्याला संघाबाहेर जावे लागते. गौतम गंभीर पण त्याच परिस्थितीतून जात आहे, पण यामधून मार्ग काढत तो पुनरागमन करेल. इंग्लंडकडून मायदेशात पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचा पाय खोलात गेला आहे. तरी आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या मालिकेत टीम इंडियाचेच पारडे जड असणार आहे. ही मालिका युवा खेळाडूंसाठी महत्त्वाची असणार आहे, त्यांच्या प्रतीभेचा कस लागणार आहे.

Leave a Comment