बॉलीवुड मला समजले नाही- इरफान ख़ान

ग्लोबल सिनेमाच्या नकाशावर भारतीय अभिनेता इरफान ख़ानचे नाव गेल्या काही दिवसापासून सातत्याने चमकत आहे. मात्र त्या तुलनेत बॉलीवुडच्या मसाला सिनेमात तो कमी प्रमाणात काम करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्याला सुद्धा हा प्रश्न सतत भेडसावत आहे.

याबाबत बोलताना इरफान म्हणाला, ‘ इंडस्ट्रीला कधीच समजले नाही की मला कोणती भूमिका द्यावी, एक वेळा मला त्यांनी विलेनची ऑफर दिली होती. मात्र मी ती स्पष्टपणे नाकारली. त्यामुळे आता मला कशा स्वरुपाची भुमिका द्यावयाची हे त्यांना पण माहित नाही आणि मला पण काही सुचत नाही. त्यामुळे मला वाटते की बॉलीवुड मला अजून समजलेच नाही.’

कमर्शियल हिंदी सिनेमा तो करू शकत नाही. त्याला एंटरटेनमेंट करणे जमत नाही. त्यामुळे त्याला गेल्या काही दिवसपासून हवी तशी भूमिका मिळत नसल्याने तो बॉलीवुडपासून दूर जात आहे. बॉलीवुडमध्ये काही दिवसापासून १०० कोटी रुपायची कमाई करना-या अभिनेत्याची सध्या चलती आहे. त्यामुळे इरफानला सध्या मागे पडला आहे. येत्या काळात त्याचा साहेब, बीवी और गैंग्सटर रिटर्न्स हा सिनेमा येत आहे. या सिनेमात त्याने माही गिल आणि सोहा अली खान सोबत प्रमुख रोल केला आहे. हा त्याचा बहुचर्चित सिनेमा आठ मार्च रोजी रिलीज होणार असून या सिनेमाकडून त्याच्या खूप अपेक्षा आहेत.