पाळण्यातल्या मुलींनाही बुरखा घालण्याचा फतवा

सौदी अरेबिया – सौदी धर्मगुरू शेख अब्दुल्ला दाऊद यांनी नवजात मुलींनाही बुरखा घालणे बंधनकारक करणारा फतवा काढला असून त्यामुळे या मुलींवर लैगिंक हल्ले होणार नाहीत असे स्पष्टीकरणही दिले आहे. इस्लामिक टिव्हीवर एका मुलाखतीत बोलताना या धर्मगुरूंनी वैद्यकीय आणि  सुरक्षा यंत्रणांचा हवाला देऊन सौदीत लहान लहान मुलींवरही लैगिक अत्याचार होतात असेही सांगितले. इंटरनेटच्या माध्यमातून ही मुलाखत जगभर प्रसारित झाली असून या फतव्याबद्दल अनेक मुस्लीम मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या धर्मगुरूंना असा फतवा काढल्याबद्दल दोषी ठरवावे अशीही मागणी पुढे येऊ लागली आहे. असले फतवे म्हणजे इस्लामसाठी नुकसानीचे आणि बदनामीचे असल्याचे मतही जाणकार व्यक्त करत आहेत. माजी न्यायाधीश शेख मोहम्मद झालना यांनी इस्लामनुसार वयात आल्यानंतर मुलींना बुरखा घालण्याचे बंधन आहे असे सांगितले. ते म्हणाले की कोणत्याही धर्मगुरूने काढलेला फतवा मानला पाहिजे असे बंधन नाही. त्यामुळे या फतव्याकडे मुस्लीमांनी दुर्लक्ष करावे. असले अनधिकृत धार्मिक फतवे जारी करून लहान मुलींवर अन्याय केला जात असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment