परळी वीज केंद्रात उरला सात दिवसांचाच पाणीसाठा!

बीड: विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा तीव्र जाणवत असताना आता वीज टंचाईचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे दुष्काळाचा फटका आता पुन्हा एकदा वीजनिर्मिती केंद्राला बसण्याची शक्यता आहे.

राज्याच्या वीज उत्पादनात महत्त्वाचा वाट असलेल्या परळी वीजनिर्मिती केंद्रामध्ये फक्त ७ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे वीजनिर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर केंद्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या वसाहतीमध्येही पिण्यास पाणी नसल्यानं दुहेरी संकट उभे ठाकले आहे.

याआधी पाण्याची कमतरता भासल्याने नजिकच्या धरणातून पाणी सोडण्यात आलं होते. पण आता तिथले पाणीही कमी झाल्याने वीज टंचाईचीही भीती निर्माण झाली आहे.

Leave a Comment