कसोटी संघात बदलाची शक्यता कमीच

आगामी काळात होत असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड रविवारी होणार आहे. सीनियर खेळाडूंची जागा घेण्याइतपत योग्यता सिद्ध करण्यात नवोदित खेळाडूंना आलेल्या अपयशामुळे पहिल्या दोन कसोट्यांसाठी फारसे बदल न करता संघ निवडला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

जलदगती गोलंदाज भुवनेश्वरकुमार आणि शमी अहेमद या दोन नवोदितांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उत्तम प्रदर्शन केले होते. मात्र, ईशांत शर्मा, एस. श्रीशांत यांच्या नावाचा विचार आधी होऊ शकेल. कसोटी क्रिकेटचा अनुभव ही एकमेव या दोघांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.

त्यानंतर फिरकीपटू अश्विन, प्रग्यान ओझा, हरभजनसिंग आणि अमित मिश्रा किंवा पीयूष चावला यापैकी चौघांना संधी मिळू शकेल. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणारी निवड समिती आक्रमक धोरण अवलंबवेल असे वाटत नाही.

गेल्या काही सामन्यात संधी देऊनही नवोदित खेळाडूंना आलेल्या अपयशामुळे पहिल्या दोन कसोट्यांसाठी फारसे बदल न करता संघ निवडला जाणर आहे. याचाच अर्थ इंग्लंडविरुद्ध मालिकेत खेळलेलाच संघ जवळपास या कसोटी मालीकेसाठी कायम असेल.

Leave a Comment