उत्तर कोरियाने घेतले अणवस्त्र चाचणी

पाँगयांग : देशाच्या विकासाला दुय्यम महत्व देत शस्त्रसज्जतेच्या मागे लागलेल्या उत्तर कोरियाने मंगळवारी सकाळी तिसरी अणुचाचणी घेतली. ही चाचणी ज्या ठिकाणी झाली तेथे ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे कृत्रिम भूकंपाचे धक्के जाणवले. चीनच्या उत्तर-पूर्वेला उत्तर कोरियाची सीमा आहे तेथेही या भूकंपाचे धक्के जाणवले.

उत्तर कोरियाने यापूर्वी २००६ आणि २००९ मध्ये अण्विक उपकरणांची चाचणी घेतली होती. आजच्या चाचणीने उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे उल्लंघन केले असून यामुळे दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामधील तणावमध्ये अधिक भर पडणार आहे. उत्तर कोरियाचे माजी नेते किम जोंग यांचा शनिवारी वाढदिवस होता त्या दिवशी ही चाचणी होईल असा चीन आणि पाश्चिमात्य देशांचे अंदाज होता.

या अणुचाचणीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला मंगळवारी संध्याकाळी तातडीची बैठक बोलवण्याची विनंती केली आहे. सन २००९ मधील अणुचाचणीनंतर उत्तर कोरियाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवण्यात आला होता. त्याचवेळी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने उत्तर कोरियावर अनेक निर्बंधही लादले होते. उत्तर कोरियाचा विकास खुंटलेला असताना या देशाकडून सतत विविध शस्त्रास्त्रांच्या चाचण्या सुरू असतात.

Leave a Comment