आता साईबाबाही दुष्काळी मदतीला

शिर्डी- दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. कालच सोमवारी मुंबईतील सिद्धीविनायक ट्रस्ट, पुण्यातील दगडूशेठ ट्रस्ट त्यानंतर आता राज्यातील सर्वात श्रीमंत देवस्थान संस्थान असलेल्या साई ट्रस्टनेही मदतीचा हात दिला आहे.

साई संस्थानाच्यावतीने टंचाईग्रस्त भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी, ५ हजार लीटरच्या सुमारे एक हजार टाक्या देणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे. अर्थात या टाक्या देण्यापूर्वी त्यांना न्यायालयची परवानगी घ्यावी लागणार आहे. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टने दुष्काळग्रस्तांना २५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यातील दगडूशेठ मंदिर ट्रस्टने काल विभागीय आयुक्तांची भेट घेतली आणि सांगलीतील एक गाव दत्तक घेण्याचा मानस असल्याचे सांगितले. याशिवाय पुण्यातील गणपती मंडळेही दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आली आहेत. यामुळे दुष्काळ निवारणास काही अंशी मदत होईल हे निश्‍चित.

Leave a Comment