सचिने केली सुनील गावस्करची बरोबरी

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या १४० धावांची नाबाद शतकी खेळी केली. त्याच्या या खेळामुळे मुंबईचा डाव ४०९ धावांत आटोपला. इराणी करंडक सामन्यात त्यामुळे शेष भारत संघाने पहिल्या डावात निर्णायक ठरणारी ११७ धावांची आघाडी घेत तिसर्‍या दिवसअखेर दुसर्‍या डावात १ बाद २७ अशी मजल मारली होती. वानखेडेवर सचिनने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपल्या २५ हजार धावादेखील पूर्ण करताना सुनील गावसकरच्या प्रथर्मशेणी क्रिकेटमधील ८१ शतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

सचिनने या सामन्यात दमदार फलंदाजी केली. अजिंक्य रहाणे (८३) पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरल्यानंतर फलंदाजीची तिसर्‍या गिअरमधील गाडी सचिनने पहिल्या गिअरमध्ये टाकली. भारतीय संघातील प्रवेशासाठी धडपडत असलेला रोहित शर्मा बेजबाबदार फटका मारून बाद झाला. कर्णधार अभिषेक नायरचे अष्टपैलुत्व फलंदाजीत या वेळी दिसले नाही. त्यामुळे ३ बाद २३४ अशा स्थितीत शेष भारतावर पहिल्या डावात आघाडी केल्याचे स्वप्न पाहणार्‍या मुंबई संघाचा पहिला डाव ४०९ धावांत गडगडला. सचिन तेंडुलकर ३४३ मिनिटे किल्ला लढवत होता. १९७ चेंडूंत १८ चौकार व २ षटकारांसह त्याने सुनील गावसकर यांच्या प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधील ८१ व्या शतकाची बरोबरी केली.

लिटल मास्टर एका टोकाकडून संयमाने व जबाबदारीने खेळत असतानाच मुंबईच्या मधल्या व तळाच्या फलंदाजांनी बेजबाबदार फलंदाजी करून मुंबईच्या विजयाची शक्यता दुसर केली. रोहित शर्मा व अभिषेक नायर हे दोन मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज सचिन तेंडुलकरसोबत भागीदारी रचण्यात अपयशी ठरले. त्यामुळे सचिन तेंडुलकरचे शेष भारताविरुद्ध आघाडी घेण्याचे स्वप्न साकार होऊ शकले नाही.

Leave a Comment